” अतिक्रमण मुक्त विशाळगड ” आंदोलनाला हिंसक वळण ?
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण मुक्त विशाळगड या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समजत आहे. अज्ञातांकडून दुचाकी, चार चाकी गाड्यांची तोडफोड, जाळपोळ देखील होत असल्याचे समजत आहे. तसेच लोकांना मारहाण देखील झाल्याचे समजते. पाच जणांना उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे समजते.