शहीद श्रावण माने कुटुंबियांच्या घरी खासदार राजू शेट्टी यांची भेट
बांबवडे : शहीद जवान श्रावण माने यांच्या कुटुंबियांच्या घरी खासदार राजू शेट्टी यांनी सांत्वनपर भेट दिली.
ज्यावेळी शहीद जवान श्रावण माने यांच्यावर शासकीय इतमामात संस्कार करण्यात आले, नेमके त्याच दिवशी पूर्वनियोजित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मुंबई इथं शासनाशी बैठक होती. त्यामुळे खासदार शेट्टी यांना अंत्यसंस्कारावेळी येता आले नाही.
त्या अनुषंगाने खासदार शेट्टी यांनी शहीद श्रावण माने यांच्या घरी जावून कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खासदारांसोबत स्वाभिमानी युवा संघटनेचे अध्यक्ष सागर शंभू शेटे, सुरेश म्हाउटकर ,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.