आमदार कोरे यांच्यावतीने कांडवण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था
बांबवडे : शाहुवाडी-पन्हाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. विनयराव कोरे साहेबांच्या माध्यमातून कांडवण ते विरळे या विद्यार्थ्यांच्या साठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती विरळे-पळसवडे चे माजी सरपंच कृष्णा पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

यावेळी पाटील म्हणाले कि विरळे इथं उदयगिरी निकेतन महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात १२ वी पर्यंत शिक्षण दिले जाते. कांडवण ते विरळे हे अंतर ६ कि.मी. आहे. सध्या एसटी चा संप सुरु असून, विद्यार्थ्यांना शाळेत, तसेच कॉलेज मध्ये येण्यासाठी पायी पायपीट करावी लागते. हि परिस्थिती विचारात घेवून आमदार कोरे साहेबांनी सुमारे १०० विद्यार्थ्यांची वाहतुकीची व्यवस्था करून दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांना जणू शिक्षणाचे अमृतपान करविले आहे. यासाठी पंचक्रोशीच्या वतीने कोरे साहेबांचे मनस्वी आभार मानत आहे.

यासाठी कृष्णा पाटील यांनी पाठपुरावा केला असून, त्यांचे देखील आभार पंचक्रोशीच्या वतीने मानण्यात येत आहे.