आम.डॉ.कोरे,कर्णसिंह गायकवाड यांचा उत्तर भागात पाहणी दौरा
शित्तूर तर्फ वारुण ( मनीष नांगरे ) : शाहुवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांनी तालुक्याच्या उत्तर भागात म्हणजेच शित्तूर तर्फ वारुण पंचक्रोशीतील पाहणी केली असता, येथील नागरिकांना जे पिडीत आहेत, ज्यांना पुराचा त्याचबरोबर डोंगर घसरून ज्यांचे नुकसान झाले आहे, अशांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी,यासाठी मी प्रयत्नशील असेन, असे वक्तव्य आमदार डॉ. विनयरावजी कोरे, यांनी पाहणी दौऱ्या प्रसंगी केले.

या उत्तर भागात मुळातच पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे नद्यांना पूर नेहमी येतो. पण यावर्षीची परिस्थिती अधिक वेगळी होती. पावसाबरोबर डोंगर घसरून मातीचा मलबा वेगाने येत होता. यामुळे येथील शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले. एक तर,पिके पाण्याखाली गेली, नाहीतर डोंगराच्या मातीखाली गाडली गेली. असे दुहेरी संकट येथील शेतकरी वर्गावर आले आहे. अशावेळी शेतकरी वर्गाला सावरणे गरजेचे आहे. यासाठीच हा पाहणी दौरा आहे.

यावेळी शित्तूर, उखळू, शिराळा, खेडे, सोंडोली, आदी गावात दौरा केले.
यादरम्यान गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड सरकार, सर्जेराव पाटील (दादा), पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, बबन पाटील शिराळे वारुण, पै. तानाजी भोसले, रंगराव पाटील, बबन पाटील (आप्पा ), किरण पाटील, विष्णू पाटील, अनिल पाटील, विश्वास पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तर प्रशाकीय यंत्रणा शाहुवाडी चे तहसीलदार गुरु बिराजदार, सार्व.बांधकाम विभागाचे श्री भोसले, कृषी अधिकारी, त्याचबरोबर वीज वितरण कंपनी चे अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते.
दरम्यान सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आमदार डॉ. विनय कोरे यांनी शित्तूर तर्फ वारुण इथं आढावा बैठक घेतली..