पंचशील तरुण मंडळ सोनवडे ,चा जयंती सोहळा संपन्न
बांबवडे ( प्रतिनिधी ):
विश्वमान्य असलेल्या बौद्ध धर्माचा प्रत्येकाने स्वीकार केला पाहिजे, तरच आपला देश विकासाच्या वाटेवर प्रगती करू शकेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील सांगितले होते कि, माझा जन्म जरी हिंदू धर्मात झाला असला, तरी मी मरताना मात्र माझे धर्मांतर झालेले असेल. म्हणजेच बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला असेल .असे मत प्रतिपादन राज्याचे निवृत्त वित्तीय सल्लागार सुरेशराव गायकवाड साहेब यांनी केले.
सोनवडे तालुका शाहुवाडी इथं पंचशील तरुण मंडळाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांचा संयुक्त जयंती सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशराव गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी रंगराव वाघमारे होते. तर सूत्रसंचालन उत्तम वाघमारे यांनी केले.
गायकवाड साहेब आपल्या मनोगतात पुढे म्हणाले कि, डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर करून एक वेगळा टप्पा गाठला होता. आपण केवळ जयंत्या करून चालणार नाही, तर त्यांनी घालून दिलेला मार्ग आत्मसात करत, आपली पुढची वाटचाल केली पाहिजे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगराव वाघमारे म्हणाले कि, डॉ. आंबेडकरांनी आपल्या कर्तुत्वातून आपला समाज जिवंत ठेवला आहे. त्यांचे आदर्श च आपल्या समाजाला तारणार आहेत. म्हणूनच आपली मुले सुशिक्षित होणे हि, काळाची गरज आहे. यातूनच आपण डॉ.आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करणार आहोत.
यावेळी प्रा. डॉ. बापूसाहेब कांबळे म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने क्रांतिसूर्य असून, ते ज्ञानाचे केंद्रबिंदू आहेत. नैसर्गिक सूर्य हा, ताऱ्यांना, चंद्राला प्रकाश देतो, पण हा महामानव म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व जगाला ज्ञानाचा प्रकाश बहाल करणारे क्रांतिसूर्य ठरत आहेत.
यावेळी बौद्ध सेवासंघाचे स्थानिक शाखेचे सरचिटणीस विजय कांबळे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले कि, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून ते बौद्ध जयंती पर्यंत आपल्या मुलांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांची चरित्र तसेच ग्रंथ वाचण्यास भाग पाडले पाहिजे. आपल्या मुलांना या थोर महामानवांची चरित्रे समजली तरच आपल्या समाजाचा विकास होणार आहे.
यावेळी सुभाष वग्रे यांनी महामानवांच्या चारीत्रांविषयी प्रबोधन करताना सांगितले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एक दिवस हा देश महासत्ता बनेल.
यावेळी पंचशील तरुण मंडळाने विविध मान्यवरांचे सत्कार संस्थेचे बोधचिन्हे देवून केले. तसेच ज्या समाज बांधवांनी बुद्धविहारास फुल न फुलाची पाकळी समजून सहकार्य केले, अशा मंडळींचा देखील सन्मान करण्यात आला. यामध्ये गावातील रमाई महिला बचत गट, जयभीम महिला बचत गट, महादेव महिला बचत गट, या महिलांनी देखील बुद्ध विहारास सहकार्य केले.
यावेळी शामराव वाघमारे, सर्जेराव वाघमारे, अशोक वाघमारे,पताबाई वाघमारे,आनंदा वाघमारे, नागेश वाघमारे, अमर वाघमारे आदिमंडळींचा सन्मान करण्यात आला. यावेळी अविनाश गायकवाड यांनी एक सुंदर गीत उपस्थितांना ऐकवून मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमास शंकर पाटील, अनिल पाटील, कोंडीबा काशीद,आदि मान्यवर तसेच अमर वाघमारे उपाध्यक्ष, श्रीकांत वाघमारे सचिव, प्रकाश वाघमारे उपसचिव, उत्तम वाघमारे खजिनदार, दीपक वाघमारे सह खजिनदार, दशरथ वाघमारे संपर्क प्रमुख मुंबई, संदीप वाघमारे संपर्क प्रमुख मुंबई व पंचशील तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.