उचत इथं आणखी एक महिला पॉझीटीव्ह : संबंधित यंत्रणा सतर्क
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील उचत येथील आणखी एक महिला (वय अंदाजे ६० वर्षे ) कोरोना संक्रमित असल्याचे रात्री उशिरा समजले आहे. हि महिला संबंधित तरुणाची आई आहे. या घटनेमुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उचत येथील तरुण निजामुद्दीन येथील कार्यक्रमास जावून आल्यानंतर ठिकठिकाणी गेला आहे. त्यामुळे तो तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतील लोकांच्या संपर्कात आल्याने त्या मंडळींना सुद्धा तपासणी साठी ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेमुळे उचत इथं औषध फवारणी सातत्याने करण्यात येत असून येथील ५ किलोमीटर चा परिसर सील करण्यात आला आहे. या दरम्यान संपर्कात आलेल्या २३ जणांना तपासणी साठी ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व घडामोडींमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा याबाबत सतर्क असून, आणखी कोणी व्यक्ती, या व्यक्तीच्या संपर्कात आले आहे का? याची माहिती घेण्यात येत आहे.