उचत इथं कार ला अपघात :अपघातात किरकोळ जखमी
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : कोल्हापूर हून शाहुवाडी तालुक्यातील पालेश्वर इथं निघलेल्या कुटुंबियांच्या कार चा उचत इथं अपघात झाला असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कारमधील मंडळींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दि.१६ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर हून पालेश्वर इथं निघालेल्या कर ला उचत इथं अपघात झाला. कार मागे घेताना, ब्रेक वर पाय देण्याच्या प्रयत्नांत चुकून एक्सलेटर वर पाय पडल्यामुळे कार चा वेग वाढला, आणि सुरक्षा कठड्याला धडकून कार ने पलटी खाल्ली.

या अपघातात कारमध्ये आठ जण होते. त्यांना तत्काळ मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णांना किरकोळ मुकामार लागल्याचे निष्पन्न झाले.

या अपघातात जखमी झालेले रुग्ण पुढीलप्रमाणे :राहुल नलवडे वय ३८ वर्षे , सिद्धी पाटील वय १० वर्षे, दिव्या पाटील वय १२ वर्षे, अपर्णा पाटील वय ३२ वर्षे, धनश्री नलवडे वय २८ वर्षे, दिगंबर पाटील वय ३७ वर्षे, अनुश्री नलवडे वय २ वर्षे, नारायणी नलवडे वय ९ वर्षे , अशी अपघातातील रुग्णांची नावे असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.