गुन्हे विश्वसामाजिक

उचत येथील युवकावर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दपारी ची कारवाई: हिंदुत्ववादी संघटनांची मागणी मान्य

बांबवडे : उचत तालुका शाहुवाडी येथील लाईन गल्ली येथील सोहेल टिपू सुलतान मालदार या युवकाने इंस्टाग्राम वरील आक्षेपार्ह पोस्ट लाईक केल्याप्रकरणी त्यास हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती, शाहुवाडी पोलीस ठाणे यांच्याकडून मिळाली आहे.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोहेल टिपू सुलतान मालदार या युवकाने इंस्टाग्राम वरील पोस्ट लाईक केल्याप्रकरणी त्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याने केलेल्या लाईक मुळे मलकापूर नगरीतील वातावरणात तणाव निर्माण झाला होता. येथील हिंदुत्ववादी संघटनांनी या युवकावर कारवाई करण्याची मागणी केली होती.


या युवकावर यापूर्वी देखील अशा स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.


तालुक्यात शांतता कायमस्वरूपी नांदावी, या अनुषंगाने शाहुवाडी, पन्हाळा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून हि हद्दपारी ची कारवाई करण्यात आली आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!