‘ उदय साखर ‘ वर राष्ट्रवादीच्या विविध निवडी संपन्न -आढावा बैठकीत विविध पदाधिकारी उपस्थित
बांबवडे : उदयसिंगराव गायकवाड सह.साखर कारखाना,बांबवडे-सोनवडे तालुका शाहुवाडी इथं शाहुवाडी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकूण २६ राष्ट्रवादी सेल च्या तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार व जिल्ह्याचे नेते नाम. हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी संपन्न झाल्या. तर महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड (दादा ) यांच्या प्रमुख सूचनेनुसार, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हि आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, युवा नेते रणवीरसिंग गायकवाड ( सरकार ), महादेवराव पाटील साळशीकर, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे (पैलवान ), राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष अजित पाटील, यांच्यासह कारखान्याचे संचालक व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कारखाना कार्यस्थळावर संपन्न झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी सेवा दल, राष्ट्रवादी युवक अल्पसंख्यांक सेल, सोशल मिडिया सेल, डॉक्टर सेल, सामाजिक न्याय विभाग सेल, अपंग सेल, पदवीधर सेल, विद्यार्थी सेल अशा विभागाच्या पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी संपन्न झाली.