एक दिया देश के नाम : बांबवडे पंचक्रोशीत भारत माता कि जय, वंदे मातरम् घोषणांनी देशाच्या एकतेचे दर्शन
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे आणि पंचक्रोशीत ग्रामस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवहानानुसार रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील लाईट घालवून दिवे (पणती), मोबाईलचे टॉर्च लावून देशाच्या एकतेचे दर्शन घडवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनाला बांबवडे आणि पंचक्रोशीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला, हेच या घटनेतून दिसून येते. दरम्यान तरुणांनी भारत माता कि जय, वंदे मातरम् अशा घोषणा देऊन वातावरणात देशभक्तीचे चैतन्य फुलवाले.