एक “ माणुसकीचा सेतू ” म्हणजे गामाजी ठमके
बांबवडे : सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या शाहुवाडी तालुक्यात अनेक नर रत्नांची खाण आहे. या तालुक्याला निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची झालर आहे. आणि तशाच प्रकारची माणसं या तालुक्यात जन्माला आली आहेत. ज्यांनी आपल्या कर्तुत्वातून माणुसकी निर्माण केली आहे .ती केवळ शाहुवाडी तालुक्यातच नव्हे, तर जयसिंगपूर तालुक्यातील इचलकरंजी इथं देखील त्यांनी आपल्या कर्तुत्वातून माणसं जोडली आहेत. अशाच “ माणुसकीच्या सेतू ” चा वाढदिवस १ जून रोजी आहे. हा माणुसकीचा सेतू म्हणजे शाहुवाडी तालुक्यातील गोगवे पैकी ठमकेवाडी येथील गामाजी ठमके हे होत. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुरोग्य लाभो, त्यांना त्यांच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, आमच्या साप्ताहिक “ शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज ” च्या वतीने देण्यात येत आहे.
गामाजी ठमके यांनी आपल्या तारुण्याला इचलकरंजी येथून सुरुवात केली. त्याचबरोबर आपल्या राजकारण आणि समाजकारणाची सुरुवात सुद्धा त्यांनी तिथूनच केली. त्यांनी जनता दल च्या माध्यमातून तेथील गणेश नगर मध्ये समाजकारणाची बीजे रुजवलीत. त्यानंतर ते शाहुवाडी तालुक्यात देखील तितक्याच तन्मयतेने समाजकारण करू लागले. हे शाहुवाडी तालुका विकास मंच च्या माध्यमातून समाजकारण करीत असताना, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. परंतु मधल्या काळात काहीतरी खटकले, आणि ते तटस्थ राहिले. दरम्यान विधानसभेची निवडणूक लागण्याचा काळ जवळ आला, दरम्यान विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांच्या संपर्कात ते आले. आणि त्यांनी त्यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला. परंतु राजकारणापेक्षा समाजकारणात त्यांनी अधिक रस घेतला.
अशाच राजकारण आणि समाजकारण अशी दोन्ही धुरा सांभाळण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आज त्यांचा हा वाढदिवस निश्चितच त्यांना आनंदाचा आणि सुख समृद्धीचा जावो.
सध्याचा काळ कोरोना चा आहे. या काळात सगळ्यांचीच कोरोनाशी झुंज सुरु आहे. अशा परिस्थितीत गामाजी देखील स्वयमप्रेरणेने यथाशक्ती मदत करीत आहेत. म्हणूनच वाढदिवसाचा कोणताही मोठा सोहळा आयोजित केलेला नाही. तरीदेखील आपण आपल्या मैत्रीची जाणीव ठेवून, त्यांना पुन्हा शुभेच्छा देवू या. ठमकेसाहेब पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त आपले हार्दिक अभिष्टचिंतन.