” एसपीएस न्यूज ” वेब पोर्टल सांगली जिल्ह्यात दाखल : ब्युरो चीफ प्रशांत पवार
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातून सुरु झालेलं ” एसपीएस न्यूज ” वेब पोर्टल आता सांगली जिल्ह्यात दाखल होत आहे. या जिल्ह्याची जबाबदारी प्रशांत आनंदराव पवार हे सांभाळणार आहेत.

दोन वर्षापूर्वी शाहुवाडी तालुक्यातून सुरु झालेलं हे वेब पोर्टल या २०२१ साली सांगली जिल्ह्यात पदार्पित होत आहे. येथील सर्व जबाबदारी श्री प्रशांत पवार सांभाळणार असून येथील ब्युरो चीफ म्हणून ते काम सांभाळणार आहेत. यामध्ये नेमणुका, वेतन,कमिशन, जाहिरात, आणि बातमीदार अशा सर्वच आघाड्यांवर पवार काम पाहणार आहेत. सांगली जिल्ह्यातील सहकार आणि तेथील कारभार पाहता लवकरच आपलं वेब पोर्टल नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही.

श्री प्रशांत पवार यांना त्यांच्या सांगली जिल्ह्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.