कडवी, कासारी खोऱ्यात शेतकऱ्यांची लगबग
आंबा प्रतिनिधी : गेल्या चार दिवसापासून शाहुवाडी तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तालुक्याच्या आंबा कडील भागात शेतकऱ्यांच्या रोपलावणी अडकून पडल्या आहेत. नक्षत्र बदलले असल्याने कदाचित पावसाने ओढ दिली आहे. रोहिणी नक्षत्राला पूर्वी बुजुर्ग मंडळी म्हातारा पाऊस म्हणायचे. तोच म्हातारा पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांना विहिरी च्या पाण्यावर चिखल करण्याची गरज भासत आहे. त्याशिवाय रोप लावण करता येत नाही. अशी परिस्थिती शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागात झाली आहे.

दरम्यान कडवी, कासारी खोऱ्यात पायरी पद्धतीने भाताची रोप लावण करावी लागते. भात रोप पेरणी च्या टप्प्यात पावसाने ओढ दिली, तर तरवे उगवनीच्या वेळी धुवाधार पाऊस झाला.

सध्या पावसाने ओढ दिल्याने, शेतकऱ्यांना ओढे, नाले अडवून पाणी शिवारात सोडावे लागत आहे. त्यामुळे आंबा , तळवडे परिसरात शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे.