कष्टाच्या माध्यमातून शिक्षणाचा यज्ञ चेतंत ठेवणार- वाढदिवसानिमित्त श्री राजेंद्र डोंगरे यांचा ध्यास व्यक्त
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील चरण येथील एक व्यक्तिमत्व आज पन्नाशीत अवतरतंय. कष्टाच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेलं हे व्यक्तिमत्व सर्वसामान्य जनतेवर पहिल्यापासून प्रेम करीत आहे. त्यांची प्रशासकीय कामकाजात होणारी दमछाक देखील त्यांना माहित आहे. म्हणूनच माफक दरात जनसेवा पुरविण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. दुर्गम भागातील गरजूंना शिक्षण पुरविण्याचा त्यांनी यज्ञ मांडला आहे. असे ते म्हणजे श्री राजेंद्र श्रीपती डोंगरे. त्यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

राजेंद्र डोंगरे अगदी लहानपणापासून जनसेवेच्या माध्यमातून काम करीत आले आहेत. त्यानंतर त्यांनी स्वत:ला प्रशासकीय कामकाजात झोकून दिले. स्टँप व्हेंडर, स्टँप रायटर असा प्रवास करीत, त्यांनी अनुस्कुरा पंचक्रोशीत कै.श्रीपतराव डोंगरे शिक्षण प्रसारक मंडळ च्या माध्यमातून त्यांनी सुरज माध्यमिक विद्यालयाची गावडी इथं निर्मिती केली. आणि तेथील सामान्य लोकांपर्यंत माध्यमिक शिक्षण पोहचविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे.
त्यांची जिवनाची वाटचाल संघर्षमय परिस्थितीतून झाली. पण कष्टाशिवाय यशाला पर्याय नसतो, हे जणू ते जाणून होते. आणि कष्ट करीत राहिले. आज मात्र ते यशाच्या शिखराकडे निघाले आहेत. केवळ स्वत:चाच कधी विचार न करता, सर्वसामान्य जनता हि, केंद्रबिंदू मानून त्यांची सेवा करणं, हा त्यांच्या आयुष्याचा ध्यास आहे असे, श्री राजेंद्र डोंगरे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. आज राजेंद्र डोंगरे यांचा पन्नासावा व्हाढदिवस आहे. त्यांना आजच्या ह्या दिवशी पुनश्च मुकुंद पवार आणि परिवाराच्या वतीने मनापासून शुभेच्छा.