मुंबई लोकलचा फक्त ५०० रुपयात कुठेही प्रवास ?
मुंबई ( प्रतिनिधी ) : केवळ ५०० रुपयांमध्ये मुंबई मध्ये लोकल ने कुठेही प्रवास करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे विचाराधीन आहे. यास रेल्वेने हिरवा कंदील दिल्यास मुंबईकरांना शासनाने दिलेला हा सुखद धक्का ठरणार आहे.
मुंबईकर हा सगळ्यात अधिक कष्ट करणारा मानला जातो. जो मुंबईमध्ये कामधंद्यासाठी येतो, त्याला मुंबई आपल्या विशाल हृदयात स्थान देते, अट फक्त एकच, कष्ट करण्याची तयारी हवी. हा प्रस्ताव जर रेल्वे बोर्डाने मंजूर केला तर , अशा कष्टकरी मुंबईकरांना हि एक मोठी पर्वणी ठरणार आहे. कारण मुंबईकर हा मुंबईच्या रक्तवाहिन्या मानल्या जाणाऱ्या लोकलच्या तिन्ही लाईनवरून प्रवास करत असतो. त्या म्हणजे हार्बर,पश्चिम आणि सेन्ट्रल अशा तिन्ही मार्गाने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला हा निर्णय, नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.