कारवाई झालेल्या मलकापूर अर्बन बँकेशी कोणताही संबंध नाही- चेअरमन मलकापूर क्रेडीट सोसायटी
शाहुवाडी प्रतिनिधी : रिझर्व्ह बँकेने बंधनं घातलेली मलकापूर अर्बन बँक हि बुलढाणा जिल्ह्यातील असून , त्याचा कोल्हापूर, रत्नागिरी कार्यक्षेत्र असलेल्या मलकापूर अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी मलकापूर तालुका शाहुवाडी यांच्याशी दुरान्वये देखील संबंध नाही. केवळ नावात साधर्म्य असल्यामुळे ग्राहक, सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्यामध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे. परंतु आपल्या संस्थेशी त्याचा काहीही संबंध नाही. असे मत मलकापूर अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी मलकापूर चे चेअरमन श्री अजय लोध यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

नुकतेच रिझर्व्ह बँकेने मलकापूर अर्बन बँकेवर कारवाई करीत बँकेवर बंधनं घातली आहेत. मलकापूर अर्बन बँक आणि मलकापूर अर्बन क्रेडीट सोसायटी या नावामध्ये साधर्म्य असल्याने ग्राहकांत गोंधळ उडू नये, या अपेक्षेने संस्थेने पत्रकार परिषद बोलविली होती. त्यामध्ये चेअरमन श्री अजय लोध यांनी संस्थेसंदर्भात स्पष्टीकरण दिले.

यावेळी ते पुढे म्हणाले कि, कोल्हापूर रत्नागिरी कार्यक्षेत्र असलेल्या आणि सभासद, त्याचबरोबर ठेवीदार यांच्या विश्वासावर व संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार आणि अधिकारी-कर्मचारी वर्गाचं योगदान, यामुळे मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी ने नेहमीच यशस्वी वाटचाल ठेवली आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली आहे. यात आपल्या संस्थेचा कोणताही संबंध नाही. गेले दोन वर्षे कोरोना कालावधीत असलेली एकूण आर्थिक परिस्थिती, तसेच उद्योग व्यवसाय हे आत्ता सावरू लागले आहेत. सर्वसामान्य सभासद, ग्राहक यांचा उत्कर्ष साधण्याच्या हेतूने उभारलेल्या या संस्थेने रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन करून, संस्थेची यशस्वी वाटचाल ठेवली आहे. ठेवीदार यांचा असलेला विश्वास आणि कर्जदार यांनी वेळेत केलेली परतफेड, यामुळे संस्थेची आर्थिक सुबत्ता चांगली आहे. संस्थेच्या ठेवीत सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे संस्थेच्या ठेवीदार ,सभासद, हितचिंतक यांनी गैरसमज करून घेवू नये.असाही खुलासा चेअरमन श्री अजय लोध यांनी पत्रकरांशी बोलताना केला.

कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यात एक आदर्शवत संस्था म्हणून मलकापूर अर्बन क्रेडीट सोसायटी ने आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवली आहे. यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यासाठी संस्थेचे सर्व संचालक , संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांचेदेखील मोलाचे योगदान लाभालेआहे. या सर्व घडामोडीत सभासद आणि ठेवीदार यांनी ठेवलेला विश्वास हा तितकाच मोलाचा असून, यापुढेही अशीच विश्वासाहर्ता कायम राखून, पारदर्शक कारभारातून संस्थेचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न, हा सर्व आम्हा संचालक मंडळाचा राहणार आहे. असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर यांच्यासहित कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होता.