कुमार अथर्व सिंघण यांची नवोदय साठी निवड – परखंदळे विद्यामंदिर
बांबवडे : परखंदळे तालुका शाहुवाडी येथील परखंदळे विद्यामंदिर मधून कुमार अथर्व श्रीकांत सिंघण यांची कागल येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड झाली आहे. यासाठी साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.

त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक भगवान पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे गुरुवर्य श्री जमीर सय्यद सर, श्री विक्रम पाटील सर आणि शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. या सर्व गुरुवर्यांचे देखील हार्दिक अभिनंदन.