विजेच्या धक्क्याने कोडोली येथील तरुणाचा मृत्यू
कोडोली प्रतिनिधी-
कोडोली ता.पन्हाळा येथील युवक आशिष शंकर गावडे ( वय १६ वर्षे ) या तरुणाचा त्याच्या गावडे मळा या अमृतनगर येथील शेतात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला आहे. आशिष हा आज दिनांक १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कडबा कुट्टी मशीन सुरु करत असताना, त्याला विजेचा शॉक बसला. त्याचे वडील शंकर गावडे आणि चुलते शिवाजी गावडे यांनी त्याला उपचारासाठी कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.आशिषच्या पश्चात आई वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.