केवळ दोन हजार रुपयात कोविड सेवा:वारणानगर इथं कोविड सेंटर ची उभारणी
वारणानगर : वारणानगर ता. पन्हाळा इथं सुसज्ज कोविड सेंटर ची उभारणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
तात्यासाहेब कोरे सह. साखर कारखाना,लि. वारणानगर इथं आमदार डॉ.विनय कोरे यांच्यावतीने कोरोना केअर सेंटर चा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई म्हणाले कि, इथं केवळ दोन हजार रुपयात ऑक्सिजन बेड सहित रुग्णांना उपचार उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयाच्या माध्यमातून या महामारीला समूळ हटविण्याचा प्रयत्न करून आपण समाजभान जपू या, असेही दौलत देसाई यांनी यावेळी सांगितले.
केवळ दोन हजार रुपयात कोविड सेवा:वारणानगर इथं कोविड सेंटर ची उभारणी
यावेळी बोलताना आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले कि, ग्रामीण भागातील जनतेला उपचारांसाठी शहराची वाट धरावी लागत आहे. उपचाराचा अवाजवी खर्च सर्वसामान्य रुग्णांना पेलणार नाही, यासाठी वारणा उद्योग समूहाने १०० बेड, व १४ ऑक्सिजन बेड सहित हे कोविड केअर सेंटर उभे केले आहे. इथं रुग्णांना दररोज दुध, हळद, व नाष्टा मोफत मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागाची होणारी ससेहोलपट थांबण्यास मदत होणार आहे ,असेही आमदार कोरे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पन्हाळा चे प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शिंगटे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, सभापती तेजस्विनी शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोशल डीस्टंसिंग चे भान देखील पाळण्यात आले होते.