कोल्हापूर जिल्हा टायपिंग ओनर्स असोसिएअशन च्यावतीने 95 FMवर GCC – TBC ची जाहिरात प्रसिद्धी
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा टायपिंग ओनर्स असोसिएअशन च्यावतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्याना कॉम्प्यूटर टायपिंग जीसीसी -टीबीसी संदर्भाने सविस्तर माहिती मिळण्यासाठी ९५ एफएम वर जाहिरात करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशन च्यावतीने सांगण्यात आली.
यावेळी असोसिएशन च्यावतीने सांगण्यात आले कि, दररोज सकाळी ११.३० वाजता हि जाहिरात ३० दिवस प्रसारित करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना या कॉम्प्यूटर कोर्स संदर्भाने सर्व माहिती मिळेल. तसेच सर्व संस्था
चालकांना सुद्धा याचा लाभ होणार आहे.अशी माहिती असोसिएअशन चे अध्यक्ष सागर घाटगे, तसेच महाराष्ट्र राज्य कॉम्प्यूटर टायपिंग संघटनेच्या सदस्या अभिलाषा नाईक यांनी दिली आहे.
यावेळी ९५ एफएम रेडीओ मिरची चे अनिल दंताल उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सदस्या सौ अभिलाषा नाईक मॅडम, असोसिएशन चे अध्यक्ष सागर घाटगे सर, प्रकाश चव्हाण, अनंत पाटील सर, शिवाजी पाटील सर, चंद्रकांत पाटील सर , व संचालक मंडळ उपस्थित होती.