educational

विद्या मंदिर दरेवाडी चे वृक्षारोपण करताना विठ्ठल रुख्मिणी

पोर्ले : विद्या मंदिर दरेवाडी शाळा नं १ या शाळेने, दरेवाडी ते पन्हाळा दिंडी काढून दिंडी स्वरूपात वृक्षारोपण करून एक वेगळा आदर्श ग्रामस्थांसमोर ठेवला आहे .
आषाढी एकादशी च्या निमित्ताने विद्या मंदिर दरेवाडी शाळा नं १ या शाळेने दरेवाडी ते पन्हाळा दिंडी काढून दिंडी स्वरूपात विठ्ठल-रुक्मिणी च्या वेशभूषेत वृक्षारोपण करून गल्लोगल्ली फिरून ‘ झाडे लावा, झाडे जगवा ‘ अशा घोषणा देत जनतेसमोर एक नविन ध्यास ठेवला.
१ जुलै ते ७ जुलै पर्यंत सरकारच्या ४ कोटी झाडे लावण्याच्या निर्धारात आपलाही पुढाकार या चिमूकल्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यांना शाळेचे मुख्याद्यापक गोपालकृष्ण कालेकर सर व नामदेव पोवार सर यांचे विशेष मार्गदर्शन व शिक्षकवृंदा चे सहकार्य लाभले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!