खरा आनंद मिळवण्यासाठी जीवनाकडे सकारात्मकतेने पहा – श्री विजयकुमार जाधव
कोडोली प्रतिनिधी : आपलं जगणं, हसत खेळत जगायचं असेलं, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवण्याबरोबरच आपण जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला शिकले पाहिजे.असे प्रतिपादन विजय जाधव यांनी केले.

ते पन्हाळा तालुक्यतील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना व श्री शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या वर्षा व्याख्यानमालेत श्री विजय जाधव बोलत होते. हसत खेळत जगू या, या विषयावर श्री जाधव बोलत होते.

यावेळी श्री जाधव पुढे म्हणाले कि, आज-काल सर्वजण भौतिक सुखाच्या मागे धावण्याच्या नादात जीवनाचे खरे सुख हरवून बसल्याचे चित्र आहे. सातत्य , रेखीवपण, गणित, महत्वाकांक्षा, परिश्रम, ध्येय, निर्णय क्षमता, आणि अखंड सावधानता, हि सप्तसुरांची जीवनशैली आत्मसात करायला हवी. तरच आपलं जिवन हसत खेळत होईल, असे विचार श्री जाधव यांनी मांडले.

यावेळी विजयकुमार कोले, प्रा. आप्पासाहेब खोत, शरद महाजन, संपत चव्हाण, सरपंच गायत्री पाटील , प्रतिभा कोले, रमा काशीद, जयश्री पाटील, आदींसह रसिक श्रोते, मोठ्या संख्येवर उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख व आभार ग्रंथमित्र बाबासाहेब कवळे यांनी मानले.