खुटाळवाडी त जादूटोणा अघोरी प्रकारचा प्रयत्न
बांबवडे : खुटाळवाडी तालुका शाहुवाडी इथं जादूटोणा हा अघोरी प्रकार घडविण्यासाठी ५ मे रोजी काही लोक खोरी नावाच्या शेतात एकत्र आली होती. यामध्ये सहा जणांचा समावेश असून यात एक महिला देखील आहे.हि माहिती पोलिसांना ११२ क्रमांकावरून मिळाली.
खुटाळवाडी तालुका शाहुवाडी इथं ५ मे रोजी रात्री सव्वा आकरा वाजनेच्या दरम्यान येथील खोरी नावाच्या शेतात काही लोक अघोरी कृत्य करीत असल्याचे पोलिसांना कळल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी काही लोक खोरी नावाच्या शेतात,तर काही लोक तिकडे जाताना पोलिसांना सापडले. त्यांच्याजवळ काळ्या बाहुलीची जादू ची पूजा करण्याचे साहित्य देखील त्यांच्याजवळ सापडले.
त्या ठिकाणी १. तुकाराम हरी किटे २. सौ स्वाती तुकाराम किटे दोघे राहणार खुटाळवाडी, ३. गणपती महिपती कांबळे राहणार सुपात्रे ,४. गणेश बाबुराव खरात आनंदनगर जि. छ.संभाजीनगर, ५. संतोष लक्ष्मण वावरे राहणार आष्टी जि. अमरावती, ६. अविनाश मदनलाल पवार राहणार गजानन नगर अमरावती या सहा संशयित आरोपींना शाहुवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ व पोलीस कर्मचारी करीत आहेत.आरोपींना न्यायालयात हजार करण्यात आले आहे.