गणेशनगर मध्ये नागराजांचे दर्शन
बांबवडे : बांबवडे येथील गणेशनगर येथील गल्लीत भर दुपारी नागराजांचे दर्शन झाले.
येथील पूर्वेकडील गल्लीत नागराज आपल्या तोऱ्यात जात असताना एक तरुणी बाहेर जात होती. दरम्यान तिची नजर नागराजांवर पडताच ती घाबरली, तिने तिच्या भावाला बोलावले, दरम्यान नागराज एका बिळात विसावले. दरम्यान सर्पमित्र किशोर तळप, अंकुश दादा पाटील यांना बोलावले, परंतु नागराज काही बाहेर येईनात.

काही वेळानंतर विश्रांती नंतर नागराज बाहेर आले. गल्लीतील काही लोकांनी त्यांना पाहिले. दरम्यान पुन्हा सर्पमित्र दादा पाटील यांना बोलावले. यावेळी मात्र नागराज सर्पमित्रांशी भिडले. फुस्कारत त्यांनी दादा पाटलांना दूर राहण्याचा इशारा दिला. पण दादा पाटील यांनी मोठ्या शिताफीने नागराजांना पकडले व शेतात नेवून सुरक्षितपणे सोडले.