“मोदी-मोदी ” ” चोर है ,चोर है ” मुंबई महापालिकेत घोषणा युद्ध
मुंबई : मुंबई महानगर पालिका सभागृहात शिवसेना- भाजप या मित्रपक्षांमध्ये एकमेकांच्या विरोधात घोषणा युद्ध रंगलेलं पहायला मिळालं. विशेष म्हणजे हे घोषणा युद्ध नेत्यांच्या उपस्थितीतंच रंगलं गेलं. एकीकड “मोदी-मोदी ” , या भाजपाच्या घोषणेचा समाचार ,शिवसेनेच्या नगरसेवकांनी ” चोर है ,चोर है ” असे प्रत्युत्तर दिले गेल्यानं घडलेल्या घोषणा युद्धाचं पर्यावसान धक्काबुक्कीत झालं .
राज्य सरकारकडून मुंबई महापालिकेला देण्यात येणारा जीएसटी चा पहिला धनादेश शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार महापालिकेत आले होते. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंकडे ६४७.३४ कोटींचा धनादेश सुपूर्द केला. हे दोन्ही नेते येतानाच हे घोषणा युद्ध सुरु झालं होतं.