ग्रामीण पत्रकारांनी व्यवसायाभिमुख व्हावे : सर्जेराव पाटील पेरीडकर
मलकापूर प्रतिनिधी : ” पत्रकार ” हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. प्रत्येक पत्रकार दिनाला केवळ पत्रकारांना शुभेच्छा देवून प्रत्येकजण आपले कर्तव्य पार पाडतो. परंतु ग्रामीण पत्रकाराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, गरजेचे आहे. यासाठी शासकीय स्तरावर दुर्दैवाने काही होत नाही. तेंव्हा पत्रकारांनी पत्रकारिता सोबत अर्थार्जनासाठी स्वतंत्र व्यवसाय करावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी केले.

पत्रकारदिनानिमित्त तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा पेरीड नाका इथं संपन्न झाला. यावेळी शाहुवाडी तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी, व पत्रकारांमधील पीएचडी प्राप्त करणारे डॉ.डी.आर. पाटील यांचादेखील शाल श्रीफळ पुष्पहार देवून, यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी श्री पाटील पुढे म्हणाले कि, पत्रकारांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे, हि काळाची गरज आहे. दरम्यान पत्रकारांशी गप्पा करताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्जेराव पाटील म्हणाले कि, नेत्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढण्याचे आदेश दिल्यास निवडणूक लढविणार आहोत. परंतु आमच्याकडे मतदार नाहीत,अशी कोपरखळी देखील पाटील यांनी मारली.

यावेळी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष आनंदराव केसरे, डॉ. डी.आर.पाटील यांनी मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी पत्रकारसंघाचे उपाध्यक्ष संतोष कुंभार यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी मलकापूर नगरपरिषद चे नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, कार्यकर्ते दत्ता भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुभाषराव बोरगे, श्रीमंत लष्कर, रमेश डोंगरे, वसंत पाटील, सुखदेव पाटील, केशव डिगे आदी मान्यवर उपस्थित होते.