चांदोली धरणसाठ्यात अर्धा टीएमसीने वाढ
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर): वारणावती – चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची संततधार कायम असली तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
शनिवारी सकाळी सात पर्यंत धरणात ८ हजार ३७१ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. १ जून पासून ६जुलै अखेर एकूण८६२ मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत शनिवारी सकाळी ७ पर्यंत ६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.आज रोजी धरणात १४.५२ टीएमसी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४२.२१ आहे यावर्षी ८६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी आहे. दरवर्षी हे धरण १०० टक्के भरते.
चांदोलीतील पाऊस व धरण पातळी
शनिवारी सकाळी ७ पर्यंत २४ तासांत चांदोली परिसरात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस ८६२ मिलिमीटर झाला आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६०२.६० मीटर, तर पाणीसाठा ४११.२१० द.ल.घ.मी. आहे. धरणात १४.५२ टी.एम.सी. म्हणजे ४२.२१ टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या लो लेव्हल गेटमधून पाण्याचा विसर्ग ६७५ क्युसेकने सुरू आहे
छायाचित्र:चांदोली धरण