केदारनाथाच्या नावानं चांगभलं…
जोतीबा प्रतिनिधी : दख्खनचा राजा जोतीबा यांची याज चैत्र पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा सुरु होत आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येवर वाडी रात्जान्गिरी येथे दाखल झाली आहेत. अनेक सासनकाठ्या जोतीभा डोंगरावर आल्या आहेत.लाखो भाविकांच कुलदैवत असलेला जोतीबा आज गुलालाच्या उधळणीत आणि केदारलिंगाच्या जयघोषात न्हाऊन निघाला आहे. शासनाने यात्रेचं योग्य नियोजन केल असून वाहतूक, पाणी, आरोग्य, यांची योग्य दक्षत घेण्यात आली आहे. अनेक सेवा भावी संस्थांनी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी अन्न छत्र उभारली आहेत. अन्न दानाचा हा शिरस्ता यात्रेचं वैशिष्ठय ठरत आहे.
केदारलिंगाच्या नवान चांगभल…