छत्रपतींचा पुतळा हटवू देणार नाही- मा.आम. सत्यजित पाटील सरुडकर

बांबवडे : बांबवडे ता. शाहुवाडी इथं काल दि.११ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री काही शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बांबवडे स्थानकाजवळ स्थापित केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, त्याचबरोबर दबक्या आवाजात समाधान सुद्धा व्यक्त केले जात आहे. परंतु या घटनेने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाणे च्या हाकेच्या अंतरावर हि घटना घडली आहे. त्यामुळे अधिक आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान याबाबत शिवसेनेचे माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर यांनी देखील घटनास्थळी त्वरित भेट दिली. एसपीएस न्यूज शी बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले कि, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, पुतळा काढण्याची सूचना त्यांनी आमदार पाटील यांना केली असता, ते म्हणाले कि, याबाबत प्रशासकीय परवानगी आणण्यासाठी प्रयत्न करू, आणि आणू. परंतु सद्यस्थितीत पुतळा हटवता येणार नाही. तसे आम्ही होवू देणार नाही.

दरम्यान शाहुवाडी चे तहसीलदार गुरु बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी एवढ्यात प्रतिक्रिया देता येणार नाही, नंतर बोलू असे एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. यावेळी शाहुवाडी पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चौगुले, सहा.पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख व पोलीस कर्मचारी यावेळी घटनास्थळी दाखल आहेत.
यावेळी सर्व पक्षाची नेतेमंडळी, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येवर घटना स्थळी दाखल झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद चे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू, राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य विजयराव बोरगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेवराव गिरी, शाहुवाडी पंचायत समिती चे उपसभापती विजयराव खोत, बांबवडे चे सरपंच सागर कांबळे, माजी सरपंच विष्णू यादव, सदस्य सुरेश नारकर, संकल्प प्रभात चे बाळासाहेब रवंदे, कृष्णात दिंडे, सचिन मूडशिंगकर, विजय लाटकर, योगेश कुलकर्णी, बळीराम ठाणेकर, याचबरोबर अनेक शिवप्रेमी घटनास्थळी दाखल झाले आहेत.