वारणानगर येथे ‘ व्हिजन २०१७ ‘ चे ” सुराज्य फौंडेशन ” मार्फत आयोजन
कोडोली प्रतिनिधी:-
वारणानगर, ता.पन्हाळा येथे महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा अखंडितपणे पुढे चालविण्याच्या अभिमानास्पद कार्यासह भारतीय प्रशासन सेवेत महाराष्ट्राचा सहभाग अधिक उठावदार केला आहे. जिद्ध आणि चिकाटीच्या जोरावर यशाच्या उतुंग शिखरांना गवसणी घालणाऱ्या, सन २०१७ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरीसेवा परीक्षेत महाराष्ट्रातून निवड झालेल्या यशवंतांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन, वारणानगर येथील माजी मंत्री डॉ.विनय कोरे संस्थापित स्वयंसेवी संस्था सुराज्य फौंडेशनने केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यु.पी.एस.सी परीक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी होणाऱ्या यशवंतांचा सत्कार ” सुराज्य फौंडेशन ” मार्फत ‘ व्हिजन २०१७ ‘ या गौरव सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वारणानगर, येथील लालबहादूर शास्त्री भवन शेजारील खुल्या पटांगणात केले असल्याचे, सुराज्य फौंडेशन चे अध्यक्ष श्री.एन.एच.पाटील यांनी सांगितले.
तसेच प्रत्यक्ष या कार्यक्रमास उपस्थित न राहू शकणाऱ्या लोकांना या गौरव सोहळ्याचे इंटरनेटद्वारें सुराज्य फौंडेशनच्या www.surajyafoundation.com या संकेतस्थळावर थेट प्रेक्षपन करण्यात येणार आहे.
या गौरव सोहळ्यात यशवंतांना कोल्हापुरी फेटा आणि वजीराचे स्मृती चिन्ह देवून वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख व माजी मंत्री डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे…