Uncategorized

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनी रक्तदान शिबीर संपन्न


शाहुवाडी प्रतिनिधी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाचे औचित्य साधून शाहुवाडी येथील स्वराज्य प्रतिष्ठान , आस्था सामाजिक अपंग पुनर्वसन संस्था व राजर्षी शाहू अॅकॅडमी करंजोशी यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्प सिद्धी मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.


या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्त संकलनाचे शिवकार्य केले. गरजू, गरीब, व निराधारांना गरजेच्या वेळी मोफत रक्त पुरवठा करणे कामी सहकार्य केले.

सदर शिबिरात स्वराज्य प्रतिष्ठान चे डॉ. झुंजार माने यांनी आयुष्यातील २९ वे रक्तदान करून सर्वांपुढे एक आदर्श ठेवला. व रक्तदान उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.


प्रारंभी आस्था दिव्यांग संस्थेचे प्रा. बाजीराव वारंग, व जिल्हा बँकेचे निरीक्षक श्री नंदकुमार जामदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.


अर्पण रक्तपेढी कोल्हापूर यांच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. यावेळी अर्पण चे रवी पाटील , डॉ.नलवडे व त्यांचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.


रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी राजर्षी शाहू अॅकॅडमी चे संजय लोकरे, अनिल अत्तरकर, प्रदीप यादव, प्रा. बाजीराव वारंग, सचिन चौगुले, प्रवीण पांढरे, मेजर संदीप पाटील, समीर गुरव, दिग्विजय कुंभार, प्रसाद खोत, अनिल कांबळे, विलास (पिंटू ) पाटील, ऋषिकेश पाटील, शुभम पाटील, प्रदीप वीर व शिवप्रेमी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!