ठमकेवाडी ते बांबवडे रस्ता नुतानिकरण : बांबवडे सरपंच आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील ठमकेवाडी ते बांबवडे दरम्यानचा कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावरील रस्ता डांबरीकरण केल्याने बांबवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

एक महिन्यापूर्वी बांबवडे चे सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांनी ठमकेवाडी ते बांबवडे रस्ता अतिशय खराब झाला असून, वाहन चालकांना खड्ड्यांच्या रस्त्यातून मार्ग काढावा लागत होता. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. तसेच या खड्ड्यांमुळे उडणाऱ्या धुळीने ग्रामस्थांना अनेक रोगांना सामोरे जावे लागत होते. धूळ उडत असल्याने दुचाकी स्वारांच्या डोळ्यांच्या तक्रारी वाढत होत्या. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत, बांबवडे चे सरपंच भगतसिंग चौगुले यांनी रस्ता नुतनीकरण संदर्भात प्रशासनाला आवाहन केले होते, अन्यथा रस्ता रोको चा इशारा देखील प्रशासनाला दिला होता.
याच अनुषंगाने ठमकेवाडी ते बांबवडे हा रस्ता नुतनीकरण केला गेला आहे. असेम्त सरपंच भगतसिंग चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. याबाबत सरपंच भगतसिंग चौगुले आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
