डोणोली,बांबवडे त २,९०,२५० ची चोरी, तर अन्य तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील सौ लक्ष्मी आनंदा शेळके यांच्या घरात घुसून दोन अज्ञात चोरट्यांनी १,२०,७५० रुपयांचा मुद्देमाल व बांबवडे येथील सौ विजया महादेव पाटील यांच्या सुद्धा घरात घुसून चोरट्यांनी १,६९,५०० रुपयांचा मुद्देमाल घेवून, चाकू ने मारहाण करून पोबारा केला असल्याचे निदर्शनास आले आहे. या बरोबरच आणखी तीन ठिकाणी चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला असून तिथे त्यांना यश आलेले नाही. या दोन ठिकाणच्या चोरीत एकूण २,९०,२५० रुपयांचा माल चोरून नेला आहे. सदर घटनेची फिर्याद सौ लक्ष्मी शेळके यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, काल दि. ८ एप्रिल च्या रात्री सव्वा एक ते अडीच वाजनेच्या दरम्यान सौ शेळके यांच्या घराच्या पाठीमागील दाराचा कशानेतरी कडी कोयंडा काढून घरात प्रवेश केला. सौ शेळके व त्यांचे पती यांना चाकू मारून जखमी केले, व त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या व रोख ७५० रुपये मिळून एकूण १,२०,७५० रुपयांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला.

याचबरोबर बांबवडे येथील सरूड रोड वर रहात असलेल्या सौ विजया महादेव पाटील यांच्या डाव्या हातावर चाकूने मारून, त्यांना जखमी करून गळ्यातील सोन्याची चेन, तसेच घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून एकूण १,६९,५०० रुपये गोळा करून चोरट्यांनी पोबारा केला आहे.

एकूण डोणोली व बांबवडे येथील मिळून सुमारे २,९०,२५० रुपयांची चोरी झाली आहे. या चोरीत दोन ३० ते ३५ वर्षांचे तरुण सामील असल्याचे सौ शेळके यांनी पोलिसांना सांगितले आहे.

या घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, प्रभारी पोलीस उपाधीक्षक आर.आर. पाटील, विभागीय पोलीस उपाधीक्षक विभागाची टीम, त्याचबरोबर,ठसे तज्ञ, श्वान पथक आदी मंडळींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील, आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत.