तळवडे-आंबा इथं मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी दरोडा : रोख रक्कम, सोने आणि चार चाकी वाहन चोरीला गेले
बांबवडे ( दशरथ खुटाळे ) : दि.२४ नोव्हेंबर २०२१ रोजी कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर शाहुवाडी तालुक्यात तळवडे गावापासून आंबा गावच्या दिशेला मुख्य मार्गापासून काही अंतरावर असणाऱ्या घरावर धाडसी दरोडा पडला असून, दरोड्यात रोख रक्कम, दागिने, एक चार चाकी वाहन दरोडेखोरांनी चोरून नेले आहे. दरम्यान घरातील लोकांना मारहाण करण्यात आली आहे. सदर बाबत शाहुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांचे कामकाज सुरु झाले आहे.

आंबा गावाच्या अलीकडे रहात असलेल्या शांतय्या शंकरय्या स्वामी वय वर्षे ६० यांच्या घरावर हा दरोडा काल मध्यरात्रीच्या दरम्यान पडला आहे. रात्रीच्या वेळी दरोडेखोरांनी पुजारी आहेत का ? असा आवाज दिला. दरवाजा उघडताच सुमारे ७ ते ८ जणांनी घरात घुसून घरातील लोकांना मारहाण केली. घरातील दोन लाख रुपये रोख, सहा तोळे सोने, आणि बोलेरो हे चार चाकी वाहन घेवून दरोडेखोर पसार झाले. दरम्यान घरातील लोकांना बांधून ठेवण्यात आले होते. दोघांना मारहाण करण्यात आली आहे. एकाला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, एकाला किरकोळ मारहाण झाली आहे. असे समजते.

सदर ची फिर्याद शांतय्या शंकरय्या स्वामी यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. अधिक सविस्तर माहिती लवकरच प्रसारित करण्यात येईल.