‘तृप्ती देसाई ‘ दाम्पत्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
पुणे : ‘ भूमाता ब्रिगेड ‘ च्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतींच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात ‘अॅट्रॉसिटी ‘ चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मारहाण करून पैसे उकळण्या संदर्भात तृप्ती दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
विजय मकासरे यांनी हिंजवडी पोलिसांत ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जातीवाचक शिवीगाळ करून खंडणी मागणे, मारहाण करणे, रस्ता अडविणे, असे गुन्हे या सर्वांवर दाखल करण्यात आले आहेत.