तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते श्रीराम कार्यालयाचे उदघाटन संपन्न
बांबवडे : डोणोली तालुका शाहूवाडी इथं श्रीराम मंगल कार्यालय चे उदघाटन शाहूवाडी चे तहसीलदार श्री गणेश लव्हे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
या उदघाटनासाठी समाजातील पोलीस उपाधीक्षक आप्पासो पोवार, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस निरीक्षक अभिजित पाटील,पोलीस उपनिरीक्षक श्री शिरसाठ ,शाहूवाडी पंचायत समिती चे माजी उपसभापती महादेवराव पाटील साळशीकर अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. अनेक अधिकाऱ्यांसह मान्यवर पत्रकारांनी देखील उपस्थिती लावली होती.कार्यक्रमाचे आभार संतोष कुंभार यांनी मानले
यावेळी पत्रकार सुभाष बोरगे,रमेश डोंगरे देखील उपस्थित होते. या मंगल कार्यालय च्या परिसरात प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था होती. तसेच भव्य असा डायनिंग हॉल देखील उपलब्ध आहे. भव्य व्यासपीठ कार्यालयाची शोभा वाढवीत होते.कार्यालयात सुमारे ८०० ते ९०० लोकांची व्यवस्था होईल. अशी जागा आहे. कार्यालयाच्या बुकिंग साठी ८६२३५५५०७४, ९९६०४०५५१३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
