गुन्हे विश्व

” तुझ्या मुलाचा नंबर आहे ..” : आरोपीची धमकी ? : सरूड येथील घटना

बांबवडे प्रतिनिधी : सरूड तालुका शाहुवाडी येथील बिरोबा चा माळ याठिकाणी जनावरांच्या वस्तीवर बाळसू कांदेकर यांच्या गोठ्यातील गाईच्या पायावर धारदार शस्त्राने हल्ला केला असून, गोठ्याच्या दारावर आता ” तुझ्या मुलाचा नंबर आहे. “असे लिहिले आहे. याबाबत शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या चार महिन्यापूर्वी येथील जवळच असलेल्या गोठ्यातील शर्यतीच्या बैलाच्या पायावर देखील हल्ला केला होता. या अगोदर आठ महिन्यापूर्वी गायीच्या कासेवर हल्ला केला होता. परंतु त्या घटनेची पोलिसात नोंद नव्हती. परंतु या दोन घटनांची नोंद करण्यात आली आहे. परंतु आरोपींचा अद्याप तपास लागलेला नाही.


चार महिन्यांच्या फरकाने हा दुसरा हल्ला करण्यात आला आहे.


सदरच्या घटनेमुळे शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. शाहुवाडी पोलीस ठाणे चे पोलीस उपनिरीक्षक अमीत पाटील सदर च्या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!