जेऊर मध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…
कोडोली प्रतिनिधी :-
जेऊर ता.पन्हाळा येथील रुपाली शिवाजी चिले वय ३५वर्षे या विवाहितेने आज दिनांक २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.मृत्यूचे कारण अजून समजू शकलेले नाही.
रुपाली चिले यांचे शिवाजी शामराव चिले यांच्या सोबत दुसरा विवाह झाला होता. रुपाली चिले यांना पहिल्या नवऱ्यापासून एक १६ वर्षाची मुलगी, तर शिवाजी चिले यांच्या पासून एक ६ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून, याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक व्ही.एम.कोळेकर व पोलीस कॉन्सटेबल . प्रदिप यादव हे करत आहेत..