congratulationsराजकीयसामाजिक

…’ दादांचा ‘ दरारा म्हणजे ” शब्द ” : मा. श्री. मानसिंगराव गायकवाड यांचा वाढदिवस


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात आजही गायकवाड गटाचा दबदबा कायम राखणारं नेतृत्वं तालुक्यात त्याच दिमाखात उभं आहे. त्यामुळे गायकवाड गटाचा लहानात लहान कार्यकर्ता अजूनही गुरगुरण्यास कमी पडत नाही. अशा या नेतृत्वाचा दि. ११ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. ” शब्दगंधा ” मधील सुगंध त्यांच्या अस्तित्वाने आजही आसमंतात दरवळत आहे.म्हणजेच उदय साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. मानसिंगराव गायकवाड (दादा ) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
शाहुवाडी तालुका म्हंटलं, कि, राजकीय पटलावर गायकवाड आणि सरुडकर या दिग्गजांची नावे आपसूकंच समोर येतात. अशाच दिग्गजांपैकी त्यांचा वारसा चालविणारे एक दमदार व्यक्तिमत्वं म्हणजे ‘ मानसिंग दादा ‘ . हे नाव अगदी लहान मुलाला सुद्धा परिचयाचे आहे. दादा म्हणजे भरदार शरीर यष्टी, आणि कणखर आवाज. असं हे व्यक्तिमत्व दिसायला खूपंच तापट दिसतं, पण जो त्यांच्या जवळ गेला, त्याला मात्र अभय मिळालं, म्हणून समजा. या भरदार शरीरयष्टी मागे एक हळवं हृदय सुद्धा धडधडत असतं. ते जरी दिसत नसलं, तरी त्याचा आवाज ऐकायचा असेल, तर हृदयाचे कान करावे लागतात. ते आम्ही केलेत . ज्यावेळी माँसाहेब सोडून गेल्या, त्यावेळी मात्र ह्या हृदयाचा आक्रोश आसमंतात वीज कडाडून वादळ आल्यासारखा होता. हे काही मोजक्याच मंडळींनी पाहिलं. एवढा सह्याद्रीसारखा माणूस एवढा हळवा असू शकतो, यावर कुणाचा विश्वासंच बसणार नाही.
असं हे व्यक्तिमत्व नेहमीच चर्चेत असतं. कधी राजकीय पदोन्नतीने, तर कधी बेफाम केलेल्या टीकेमुळे. कसंही असलं, तरी या माणसाने एखाद्याला शब्द दिला, कि, मात्र त्याला ते कधीही मागे पडत नाहीत. याचं उदाहरण पाहायचं झालं, तर विधानसभेचं घ्यावं लागेल. त्यांनी आमदार सत्यजित पाटील यांना दिलेला शब्द कोणताही राजकीय दबाव न जुमानता पाळला. प्रत्येक गावात स्वत: जातीनिशी फिरले. असं हे व्यक्तिमत्वं जरी कठोर वाटत असलं, तरी ते प्रत्येक कार्यकर्त्याला हवंहवंसं आणि जवळचं वाटतं. म्हणूनच प्रत्येकाला मानसिंगदादा म्हणजे आपले कुटुंबप्रमुख असल्यासारखं वाटतं.
दादांचं घर म्हणजे ” शब्द ” ,
दादांचा आवाज म्हणजे ” शब्द ” ,
दादांचा दरारा म्हणजे ” शब्द “,
अशा या गंधित ” शब्दगंधा ” तील भव्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स आणि एसपीएस न्यूज च्या वतीने पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!