गोगवे येथील वादात महिला गंभीर जखमी
बांबवडे प्रतिनिधी (दशरथ खुटाळे ) : गोगवे तालुका शाहुवाडी इथं नवीन घर बांधताना, बांधकाम केलेली भिंत दोघांच्यात आहे , असे लिहून का देत नाही. या कारणावरून झालेल्या वादात फिर्यादीच्या आई यांच्या डोक्यात दगड लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. सदर घटनेची फिर्याद शाहुवाडी पोलीस ठाणे इथं रोशन शिवाजी पाटील वय २८ वर्षे राहणार गोगवे तालुका शाहुवाडी देण्यात आली आहे. या प्रकरणात किरण जालिंदर पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलीस ठाण्याकडून मिळालेली हकीकत अशी कि, रोषण शिवाजी पाटील यांनी गोगवे इथं नवीन घराचे बांधकाम सुरु केले आहे. यावेळी घराच्या टेरेस वर पाणी मारत असताना, किरण जालिंदर पाटील, मच्छींद्र आकाराम पाटील, संगीता मच्छींद्र पाटील, गौरव गोरक्ष पाटील सर्व राहणार गोगवे तालुका शाहुवाडी, येथील असून, बांधकाम केलेली भिंत दोघात असल्याचे लिहून का देत नाहीत, या कारणावरून या मंडळींनी शिवीगाळ केली. दरम्यान झालेल्या वादातून किरण जालिंदर पाटील यांनी हातातील दगड फेकून मारला. तो दगड फिर्यादीच्या आई शालन यांच्या डोक्यात लागल्याने, त्या गंभीर रीत्त्या जखमी झाल्या. त्यांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची परीस्थिती सध्या गंभीर आहे. दरम्यान किरण सोबत आलेल्या इतर मंडळींनी खाडी फेकून मारली, व पुन्हा तुम्हाला मारू, अशी धमकी दिली.

सदर ची घटना दि.२३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजनेच्या सुमारास फिर्यादीच्या नवीन घराच्या बांधकामा ठिकाणी घडली.

दरम्यान सदर च्या प्रकरणात किरण जालिंदर पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत शाहुवाडी पोलीस ठाणे सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.