दिव्याने दिवा लावावा,अवघा आसमंत उजळावा, प्रेमाचा जिव्हाळा असा वाढावा, कि नात्यांमध्ये सुगंध दरवळावा ,
बांबवडे : दिव्याने दिवा लावावा, अवघा आसमंत उजळावा,
प्रेमाचा जिव्हाळा असा वाढावा, कि नात्यांमध्ये सुगंध दरवळावा ,

साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स , एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना, वाचकांना, हितचिंतकांना याचसोबत सर्व तमाम नागरिकांना दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा .

आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आजवर एसपीएस न्यूज परिवाराची घोडदौड सुरु आहे. वाट कितीही खडतर असली, तरी आपल्यासारखे सहकारी सोबत असले कि, प्रत्येक प्रश्नावर उत्तर निघते. यासाठी आपले मनापासून धन्यवाद.

दिपावली चे औचित्य साधून आम्हाला जाहिरात रुपी सहकार्य करणाऱ्या दिपावलीच्या सर्व शुभेच्छुक जाहिरातदारांना हि दिपावली सुख समृद्धी व भरभराटीची जावो. तसेच ग्रामपंचायत बांबवडे चे सरपंच, उपसरपंच संचालक मंडळ, ग्रामसेवक, कर्मचारीवृंद यांना देखील नेहमीच करत आलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद, आणि दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा.

तसेच आमचे वार्षिक जाहिरातदार यशराज ऑप्टीकल्स , माऊली फुटवेअर, स्वामी कलेक्शन, यशोदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भास्कर आयुर्वेर्द, यशवंत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आनंद हॉस्पिटल, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर यशवंतनगर चिखली, तालुका शिराळा, दिशा मोबाईल्स, माऊली खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स, गुरुनाथ ऑटोमोबाईल्स, यांसह सर्व नियमित व अनियमित जाहिरातदार या सगळ्यानांच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद.

आपल्या सहकार्याची नेहमीच अपेक्षा राहील. लोभ असावा, धन्यवाद आपला एसपीएस न्यूज परिवार.