१ मे पासून “बत्ती” गुल
बांबवडे ( प्रतिनिधी )
देशात फक्त राष्ट्रपती,राज्यपाल,पंतप्रधान ,पोलीस अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही लाल दिवा गाडीवर लावता येणार नाही. अशा आशयाचे आदेश केंद्रशासनाने काढले असून ,इथून पुढे कोणत्याही मंत्र्याला लाल दिवा मिळणार नाही. यामुळे मंत्री महोदयांमध्ये निश्चितच नाराजी पसरेल,पण शासकीय आदेशामुळे गप्प बसण्याशिवाय पर्याय रहाणार नाहीय. याची अमलबजावणी १ मे पासून होणार आहे.