दिशा मोबाईल चे मालक श्री अनिल शेळके यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ” दिशा मोबाईल ” चे मालक व डोणोली तालुका शाहुवाडी येथील प्रतिष्ठित रहिवाशी श्री अनिल शेळके यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

श्री अनिल शेळके हे मोबाईल फोन विक्री आणि विक्री पश्चात सेवा, तसेच अक्सेसरीज विक्री साठी प्रसिद्ध असलेल्या ” दिशा मोबाईल ” चे मालक आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी या व्यवसायात आपले नाव कमावले आहे. सुरुवातीला फोन रिचार्ज पासून सुरु केलेला व्यवसाय, आता वेगवेगळ्या स्मार्ट फोन विक्री पर्यंत पोहचला आहे. केवळ विक्री नव्हे, तर विक्री पश्चात सेवा सुद्धा दिली जाते.

आपल्या व्यवसायालाच देव मानण्याची त्यांची श्रद्धा आहे. अनिल शेळके यांचे मोबाईल फोन विक्री व दुरुस्ती तसेच अक्सेसरीज विक्रीसाठीबांबवडे येथील ” दिशा मोबाईल ” सर्व मान्य नाव आहे. अशा कर्तुत्ववान व्यक्तिमत्व असलेल्या श्री अनिल शेळके यांना पुनश्च त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.