दि.११ व १२ मे रोजी सोनवडे इथ डॉ.बासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळा
बांबवडे : सोनवडे तालुका शाहुवाडी इथं पंचशील तरुण मंडळ पंचशीलनगर यांच्यावतीने तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले, आणि महामानव प.पूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वी जयंती असा संयुक्त जयंती सोहळा दि. ११ व १२ मे २०२४ रोजी संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु.रंगराव वाघमारे आहेत.
दि.११ मे रोजी वक्तृत्व स्पर्धा, तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१२ मे रोजी स. ९.३० ते दु.२.०० वाजेपर्यंत रक्तदान शिबीर, तर संध्याकाळी ६.०० वाजता जाहीर सभा संपन्न होणार आहे.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्रकाश नाईक सर, सुभाष वग्रे हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे नियोजन आयु.अमर तुकाराम वाघमारे ( उपाध्यक्ष ), श्रीकांत वाघमारे ( सचिव ), प्रकाश वाघमारे ( सह.सचिव ), खजिनदार उत्तम वाघमारे, सह.खजिनदार दीपक वाघमारे, संपर्क प्रमुख दशरथ वाघमारे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.