….२१ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन : शिराळा नगरपंचायत कर्मचारी
शिराळा प्रतिनिधी : आपल्या विविध मागण्यांसदर्भात येथील नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी एक दिवशीय धरणे आंदोलन केले. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास २१ ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
या आंदोलनास नगरपंचायत च्या अध्यक्षा सौ सुनंदा सोनटक्के,उपाध्यक्ष कीर्तीकुमार पाटील,यांच्यासह सर्व नगरसेवकांनी या आंदोलनास पाठींबा दर्शविला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे,माजी सरपंच देवेंद्र पाटील, गजानन सोनटक्के, विश्वास साखर चे संचालक रणजितसिंह नाईक, शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष हिरुगडे, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील निकम, साळी समाज अध्यक्ष प्रकाश सावाईराम , बाजार समिती संचालक दिलीप परदेशी, भारिप चे जिल्हा उपाध्यक्ष वसंत कांबळे, भाजप शहर अध्यक्ष संतोष गायकवाड,बेरड रामोशी समाज जिल्हा उपाध्यक्ष विजय मदने, माजी पंचायत समिती सदस्य लालासो तांबीट, शिवसेना शाखाप्रमुख निलेश आवटे, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष अमोल पारेख, मुस्लीम ओबीसी संघटनेचे दस्तगीर अत्तार यांनी या आंदोलनास भेट देवून पाठींबा दर्शविला.