सामाजिक

दि.१२ नोव्हेंबर रोजी शाहुवाडी इथं ” लोक अदालत “


शाहुवाडी प्रतिनिधी : मलकापूर शाहुवाडी दिवाणी व फौजदारी न्यायालय शाहुवाडी इथं दि.१२ नोव्हेंबर रोजी
” लोक अदालत ” आयोजित केली. अशी माहिती शाहुवाडी मलकापूर न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तथा विधी सेवा समिती चे अध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिली.


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व प्रमुख जिल्हा न्यायाधीश कोल्हापूर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शनिवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता मलकापूर शाहुवाडी दिवाणी व फौजदारी न्यायालय शाहुवाडी इथं लोक अदालत चे आयोजन केले आहे.


या लोक अदालत मध्ये प्रलंबित दिवाणी दावे दाखल व पूर्व प्रकरण , बँक वसुली प्रकरण , ग्रामपंचायती व नगरपंचायत थकबाकी, घरगुती, कौटुंबिक वाद ‘ पोटगी तडजोड ‘ याबाबत चे खटले लोक अदालत मध्ये मांडले जाणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व पक्षकार, वकील आदींनी या लोक अदालत चा लाभ घेवून, यातून योग्य तो तोडगा काढून, प्रकरणे निकाली काढण्यात यावीत. यासाठी जास्तीत जास्त संख्येने पक्षकार आणि इतर यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा शाहुवाडी मलकापूर चे न्यायालय यांनी केले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!