कोल्हापूरमध्ये एसटी अपघातात दोन ठार :चालकाला हृदय विकाराचा झटका आल्याने घटना
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर शहरतील उमा टॉकीज चौकात एसटी चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात दोन ठार झाले,तर चार जण जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओढ्यावरचा गणपती मार्गावरून एसटी बस क्र.MH14- BT-1532 उमा टॉकीज कडे येत असताना, चालकाला हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गणपती मंदिरपासून उमा टॉकीज पर्यंत बस ने अनेक गाड्यांना धडक दिली. त्यानंतर बस एका सिग्नल च्या पोल ला जावून धडकली व थांबली. या दरम्यान बस ने ५ दुचाकी, २ टाटा सुमो, व एका मारुती कार ला धडक दिली .
दरम्यान हृदय विकाराचा झटका आलेल्या एसटी चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.