दुर्मिळ ” तस्कर ” जातीचा सर्प साळशी इथं आढळला …
बांबवडे प्रतिनिधी : साळशी तालुका शाहुवाडी इथं तस्कर ( Trinket snake )जातीचा दुर्मिळ असा सर्प मानवी वस्तीत पहावयास मिळाला.

साळशी येथील अक्षय सुरेश बोरगे, अरुण सुरेश बोरगे यांच्या रहात्या घरी तस्कर जातीचा सर्प आला होता.

अरविंद बोरगे यांनी वन विभागाला सदर घटनेची माहिती दिली असता, प्राणीमित्र किरण खोत रहाणार सावर्डे बु.!!, घटना स्थळी येवून, सदर सापास पकडले व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसमक्ष नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.