नवरात्रोस्तवात गरोदर स्त्रियांसाठी मोफत तपासण्या शिबीर – डॉ. एच.आर. निरंकारी
शाहुवाडी प्रतिनिधी : दि. २६ सप्टेंबर २०२२ पासून नवरात्री उत्सवामध्ये ” माता सुरक्षित तर, घर सुरक्षित ” अभियान राज्यभर राबविण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने शाहुवाडी तालुक्यात गरोदर स्त्रिया, माता यांच्या सर्वांगीण तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेचा लाभार्थी महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.आर. निरंकारी यांनी केले आहे.

या अभियानामध्ये १८ वर्षांवरील गरोदर स्त्रिया, माता, यांची रक्त, लघवी, रक्तदाब , तसेच इतर आवश्यक तपासण्या व उपचार या नवरात्री उत्सवात मोफत करण्यात येणार आहेत.

या संदर्भात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.