उद्यापासून स्वाभिमानीची जनजागृती रॅली- सागर शंभू शेटे
बांबवडे ( प्रतिनिधी ) : उद्या शुक्रवार दि.२८ एप्रिल पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कर्जमुक्ती शेतकरी जनजागृती रॅली ला प्रारंभ होणार असल्याची माहिती, स्वाभिमानीच्या युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले कि,या रॅली त संघटनेचे ३०० कार्यकर्ते मोटरसायकल घेवून सहभागी होणार आहेत. या रॅली चा समारोप ४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाने होणार आहे. शिरोळ येथील शिवाजी चौकातून या रॅली ची सुरुवात होणार आहे. इथून पुढे प्रत्येक गावात कार्यकर्ते मोटरसायकल घेवून रॅली त सहभागी होतील. कोल्हापूर जिल्ह्यातील ३३९ गावातून ११५० किलोमीटर चा प्रवास असणार आहे.
प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनीही या रॅली त सहभागी व्हावे, असे आवाहन सागर शंभू शेटे यांनी केले आहे.